मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यपालांचं सगळे निर्णय चुकीचे होते. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना सत्तेत परत बोलावणं शक्य होतं. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगणं योग्य नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असंही न्यायालयाने म्हटलं.
Shameless fellows! Laughing because SC did not unseat them, even after saying that Governor acted illegally by asking Udhav to seek vote of confidence; & that appointment of whip was also illegal.
No doubt that people will teach them a lesson in polls https://t.co/3Ooy0AbPF0— Prashant Bhushan (@pbhushan1) May 11, 2023
न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजुने लागला असून हा लोकशाहीचा विजय आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.
शिंदे-फडणवीसांच्या याच कृत्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रशांत भूषण आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर होता आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगणं, हेही बेकायदेशीर कृत्य होतं, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तरीही न्यायालयाने त्यांना (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) खुर्चीवरून हटवलं नाही, त्यामुळे ते निर्लज्जासारखं हसतायत. पण येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, यात काही शंका नाही



