मणिपूरमधील परिस्थिती सामन्य होण्याचं नाव घेत नाहीये. यातच, मणिपूर पोलिसांचे कमांडो आणि बंडखोरांमध्ये राज्याच्या अनेक भागात गोळीबार सुरु आहे. गेल्या 8 तासांपासून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत 40 बंडखोऱ्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे बंडखोर एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गनचा वापर सामान्य नागरिकांवर करत होते. अनेक गावातील घरे जाळण्यासाठी ते आले होते. मात्र, लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने आम्ही ताबडतोब कारवाई सुरु केली आहे.
सीएम बिरेन सिंह यांनी दावा केला आहे की, बंडखोर नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. मणिपूरला तोडण्याचा प्रयत्न करणारे सशस्त्र बंडखोर आणि राज्य सरकार यांच्यात ही लढाई आहे.




