नवी दिल्ली, मोदी सरकारच्या दि. १० आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची अधोगती सुरू आहे. त्या सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशावरील कर्ज १०० लाख कोटी रुपयांनी वाढले, असा दावा काँग्रेसने शनिवारी केला. तसेच, अर्थव्यवस्थेच्या स्थितीविषयी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी सरकारकडे केली.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी इतरांवर अकार्यक्षम, असमर्थ, भ्रष्ट असल्याचा आरोप करायचे. ती विशेषणे आज त्यांनाच सर्वांधिक लागू होत आहेत. देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा रोखल्यानंतर आणि बेरोजगारी, महागाई वाढवल्यानंतर मोदींनी मागील ९ वर्षात देशावर १०० लाख कोटीचा बोजा वाढविला आहे.




