नगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोद्यातील मोठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात जाहिर प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घनशाम शेलार नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नगर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी हैदराबादमध्ये ‘बीआरएस’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केल्याची माहिती खुद्द घनशाम शेलार यांनी दिली आहे.



