मुंबई: शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार नितीन देशमुख यांनी सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. पण, सत्ता पाडायची एवढंच देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं,” असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख बोलत होते. “देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. हे सपशेल चुकीचं आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं असं देशमुख म्हणाले.


