मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील फायर ब्रह्म नेते व प्रवक्त्या मनीषा कायदे यांनी काल उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यातील आनंदाश्रम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली.
प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले. बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे. कचरातून ऊर्जा निर्मिती होते असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.



