MPSC परिक्षेत यश संपादन केल्याच्या काही दिवसांतच एका तरूणीचा पुण्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला. दर्शना पवार असं मृत तरूणीचे नाव असून तिचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण ही दुर्दैवी घटना काळजाला हात घालणारी आहे. सध्या दर्शनाच्या गूढ मृत्यूवरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यापैकी काळजाला हात घालणारी ही व्हायरल झालेली पोस्ट.
जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे. तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा. एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?
वडील साधे ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने. दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर, कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती. पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेल्या.



