मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्याला कॅरमच्या खेळाची उपमा दिली आहे. तसेच नेमका कोणी कोणाचा काटा काढला? हेच कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कुणाच्या सोंगट्या कोणाच्या बाजुला आहेत हेच कळत नाहीए. म्हणजेच मनसेचे लोक कोण आहेत हेच फक्त सांगता येतं पण इतर नेते कोण कुठल्या पक्षात आहेत, हे सांगताच येत नाही. हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.
दरम्यान, एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते की अजित पवारांनी काकांकडे जरा लक्ष द्यायला हवं. पण आता काकांचं चुकलं कुठं लक्ष द्यायला? याची पत्रकारांनी आठवण करुन दिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “आता कोण कुठं चुकलंय माहिती नाही. घडाळ्यानं काटा काढला की काट्यानं घड्याळ काढलं, माहिती नाही असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.



