सातारा तालुक्यातील ठोसेघर पासून तीन किलोमीटर असणारा मालोबा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाच्या संडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावत आहे.
https://fb.watch/m0Ey-X7cbb/?mibextid=ZbWKwL
सध्या राज्यभर सर्वत्र पावसाचा जोर कायम असून सातारा जिल्ह्यातही मागील पाच दिवसापासून जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. कोयना व महाबळेश्वर परिसरातील डोंगर रांगात पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने या भागात असणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच नवजा ठोसेघर यासारखे धबधब्यावर अनेक नागरिक वर्ष विहारसाठी जात आहेत. यातच ठोसेघर पासून जवळच असणार मालोबा प्रकल्पावर पाणी ओसांडून वाहत आहे.



