पुणे : शिरूर येथे लोकनेते आमदार स्व.बाबुरावजी पाचर्णे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून पूर्वाश्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले बाबुराव पाचर्णे यांच्याकडे पाहिले जात होते. २०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांना हरवून त्यांनी विजय मिळवला होता. पाचर्णे यांनी २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.




