नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने गुजरात उच्चन्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत एम. प्रच्छाक यांच्यासह विविध उच्च न्यायालयांच्या २३ न्यायाधीशांच्याबदलीची शिफारस केली आहे. न्या. हेमंत प्रच्छाक यांनी राहुल गांधींवरील बदनामीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. न्या. प्रच्छाक यांची बदली गुजरातवरून बिहारच्या पाटणा उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल, संजीव खन्ना, बीआर गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयांच्या नऊ न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस केली होती. कॉलेजियमचा हा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानुसार, नऊ नावांपैकी चार न्यायाधीश गुजरात उच्च न्यायालयाचे आहेत, तर चार न्यायाधीश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे आहेत.
दुसरे न्यायाधीश अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आहेत. याखेरीज गुजरात उच्च न्यायालयाचे अन्य तीन न्यायाधीश- न्यायमूर्ती अल्पेश वाय .. कोगजे, कुमारी गीता गोपी आणि समीर जे. दवे यांची अनुक्रमे अलाहाबाद, मद्रास आणि राजस्थान उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती अरविंदसिंग सांगवान, अवनीश झिंगन, राज मोहनसिंग आणि अरुण मोंगा यांची अनुक्रमे अलाहाबाद, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या उच्च न्यायालयांमध्ये बदली करण्यात आली आहे.




