नवी दिल्ली : देशात लोकसभेचे वारे वाहत असताना सत्ताधारी भाजप विरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या भ्रामक प्रचाराला चोख आणि एकसमान प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने अभेद्य योजना आखली आहे. विरोधी पक्षांच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी भाजपने रालोआतील घटक पक्षांच्या प्रवक्त्यांना प्रशिक्षित केले.
भाजपने रालोआतील २६ पक्षांच्या ८५ प्रवक्त्यांसाठी एका खास कार्यशाळेचे आयोजन केले होते. काँग्रेससह देशभरातील २६ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी एकजूट झाले आहेत इंडिया’ नावाच्या विरोधी पक्षांच्या एकजुटीला रालोआतील घटक पक्षांच्या एकजुटीनेच प्रत्युत्तर द्यायचे, अशी योजना भाजपने आखली आहे.
या कार्यशाळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी यात भाग घेतला. विरोधी पक्ष हल्ले करतील तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देताना रालोआच्या वेगवेगळी दिसून येऊ नयेत. शिवाय काय, कशावर व कशा पद्धतीने बोलायचे आहे, अशा विविध विषयांची माहिती देण्यात आली.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. शिवाय, विरोधी पक्षांचे एकजूट आणि आक्रमक झाले आहेत. त्यांच्या हल्ल्याला योग्य पद्धतीने उत्तर देण्यासाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रवक्त्यांची फौज तयार केली जात आहे, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली.




