
त्यानंतर सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी याचविषयी आणखी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, “आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारणासाठी राजकारणात आलो आहोत आणि संपूर्ण पवारांची पिढी तशीच आहे. अगदी शरद पवार यांच्या सख्ख्या भगिनी सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते अर्थात ते जरी शेतकरी कामगार पक्षात असले आणि वारंवार काँग्रेसवर विशेषतः शरद पवारांवर टीका करत असायचे. तरी शरद पवार किंवा पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाच्या नातेसंबंधात कुठलीही उणीव किंवा कमतरता आलेली दिसली नाही. त्यामुळे राजकारण समाजकारण आणि कुटुंब हे वेगवेगळे ठेवण्यासाठी पवार कुटुंब प्रगल्भ आहे



