पिंपरी (प्रतिनिधी) बो-हाडेवाडीमध्ये कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. रिव्हर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प २०० मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता नव्याने बोऱ्हाडेवाडीत कचरा स्थानांतर केंद्र करू नये, अशी मागणी नागरिकांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना फोन करून एकतर्फी निर्णय घेऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.
यावेळी अश्विनी सस्ते, जीवन सस्ते, काशिनाथ धरी, उमेश उगीले, विनोद शिर्के, प्रभाकर गुरव, चंद्रकांत बिरादार, विठ्ठल अहिरे, अप्पासाहेब कोळी, बंडू मजगे, वैभव थोरात, प्रवीण सूर्यवंशी, अरुण जाधव, प्रकाश पवार, दिनेश पाटील आदी उपस्थित डेपो होते. जुना प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ यापैकी बो-हाडेवाडीत उद्यानाची जागा आरक्षित असताना कचरा स्थानांतर केंद्र उभारण्याची पालिकेने तयारी सुरू केली आहे. तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १ / १३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील सोसायटीधारकांनी विरोध दर्शविला आहे.
जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंगसाठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी आयुक्तांना फोन करून एकतर्फी निर्णय घेऊ नका. नागरिकांच्या दृष्टीने विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उद्यानाची जागा आरक्षित असतानाही प्रशासनाने कचरा स्थानांतर केंद्र उभारण्याची तयारी आहे. या संदर्भात येथील सुरू केली सोसायटी धारकांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहर पातळीवरील समस्या मांडल्या. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आयुक्तांना फोन लावून आवश्यक त्या सूचना केल्या.
अतिश बारणे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस



