बंगळुरू : ‘चांद्रयान- ३’ला चंद्रावर उतरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, ‘चांद्रयान- २’कडून ‘चांद्रयान- ३’चे स्वागत करण्यात आले आहे. चांद्रयान- २ ऑर्बिटर आणि चांद्रयान- ३ लँडर मॉड्यूल ‘विक्रम’ यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
यासंदर्भात इस्रोने ट्रिट करत माहिती दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने सोमवारी सांगितले की, २०१९मध्ये ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून सीएच रचं ऑर्बिटरने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान- ३ च्या विक्रम लँडरचे स्वागत केले आहे. चांद्रयान-रच्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या लँडरसोबत संपर्क करत संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे, ‘स्वागत आहे मित्रा’. चांद्रयान २ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर मॉड्यूलचे स्वागत केले आहे. या दोन्हींमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. 
बंगळुरूमध्ये स्थित मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये विक्रम लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
दरम्यान, २०१९ साली – चांद्रयान-२’चे लँडर चंद्रावर उतरताना कोसळले होते. पण. ‘चांद्रयान-२’चे ऑर्बिटर चार वर्षांपासून चंद्राच्या भोवती फिरत आहे. ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरमुळे चांद्रयान-३च्या लैंडिंगसाठी मदत होणार आहे.
- लँडर मॉड्युलमध्ये लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही फोटो शेअर करण्यात आले आहे. इस्रो अधिकारी या कॅमेऱ्यातून टिपलेल्या फोटोच्या माध्यमातून सपाट पृष्ठभाग शोधत आहेत. पण अजून तसा भाग काही निदर्शनास आला नाही. त्यामुळे चंद्रयान 3 चंद्रावर उतरण्यासाठी काही दिवसांचा अवधी अजून लागू शकतो.




