शर्मिला ठाकरेंनी पुण्यात श्रावण महिन्याची सुरुवात जल्लोषात केली. महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त 5 हजार महिलांनी बांगडया भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. बांगडया भरुन मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला.
प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे 5 हजार महिलांसाठी बांगडया भरणे आणि मेहंदी काढणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिला जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके, वनिता वागस्कर, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, अभिषेक थिटे, आयोजक प्रल्हाद गवळी हे उपस्थित होते.
अगदी पाच-सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरने उपक्रमाला विशेष सहकार्य केले.




