पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कॅम्प शिबिर शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत संजोग वगैरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंपरी गाव येथे होणार आहे.
यामध्ये मधुमेह, पार्किनन्स, व्हेरिकोज व्हेन्स, सांधेदुखी, थायरॉईड, पाठदुखी, कंबरदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू , टाचदुखी, सायटीका, गुडघेदुखी, मायग्रेन, स्पॉंडिलेसिस, मासिक पाळीत होणारा त्रास, हार्मोन्स प्रॉब्लेम्स, अन्नपचन संबंधित समस्या, मज्जातंतू व स्नायू संबंधित समस्या, वजन वाढणे व कमी होणे या आजारावरती थेरेपी केली जाणार आहे.




