छत्रपती संभाजीनगर : “देशात आघाडीच्या राजकारणाची आहे. त्यामुळेच आम्ही ‘एनडीए’त सहभागी झाल आहोत. पुढील काळात होणान्या सर्व निवडणुका आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाल ‘घड्याळ’ चिन्हावरच लढवू” असे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रिंस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे शहरात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तटकरे म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष म्हणून मी मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. मंत्र्यांनीही ‘जनता दरबार’ सुरू केले आहेत. बीडमध्ये रविवारी जाहीर सभा घेणार आहोत. पुढील काळात राज्यभराचा दौराही करणार आहोत. त्याची सुरुवात बीडच्या सभेपासून करणार आहोत. अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय नेते असल्याचे आम्ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या ‘पीटिशन’मध्ये सांगितले आहे.’



