मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. मध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरण आपल्या एका उपकंपनीच्या माध्यमातून ८, २७८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे रिलायन्स रिटेलमध्ये तिला ०.९९ टक्के हिस्सा कतार गुंतवणूक प्राधिकरणाला मिळणार आहे.
निधी उभारणीसाठीच्या २०२० मधील फेरीत ‘रिलायन्स रिटेल ने ४७,२६५ कोटी रुपये मिळवले होते. “रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि.मधील गुंतवणूकदार म्हणून कतार गुंतवणूक प्राधिकरणाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. कतार गुंतवणूक प्राधिकरणाचा जागतिक अनुभव आणि मूल्य निर्मितीतीतील उत्तम कामगिरीचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
भारतीय रिटेल क्षेत्रामध्ये बदल घडवून आणत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. ला जागतिक दर्जाची संस्था म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि.च्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या. कतार गुंतवणूक प्राधिकरणाची ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्था, रिलायन्सची व्यवसाय पद्धत, क्षमतांबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन दर्शविते, असेही त्या म्हणाल्या.



