पुणे : गणेश मंडळांना अनामत रक्कम (सुरक्षा ठेव) परत देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू त्यात करण्याचा आदेश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिला. तसेच उत्सव काळात अधिकृत वीजजोड घेतल्यास घरगुती दराने आकारणी होणार नमूद केले.
गणेश मंडळांच्या बैठकीत अनामत रकमेचा मुद्दा चर्चेला आला होता. मंडळांची दखल घेऊन आढावा बैठकीत पवार म्हणाले, “गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम त्यांना परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर एक ते दोन महिन्यांत पूर्ण करावी. त्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, संजीव राठोड तसेच कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
पवार म्हणाले, “गणेश तात्पुरत्या मंडळांना वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी येत असल्यास त्यासाठी सहकार्य करावे. जेथून नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे, अशा सर्व रोहित्रांची व मिरवणुकांच्या मार्गावरील वीजयंत्रणेची पाहणी करावी.”



