नवी दिल्ली : टीव्ही वाहिन्यांवर सतत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची तळी उचलून पक्षपातीपणा करणाऱ्या व समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकूण १४ प्रख्यात न्यूज अँकर म्हणजेच वृत्तनिवेदकांवर विरोधकांच्या इंडिया आघाडीने घालण्याचा घोषित केला आहे. या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली असून इंडिया आघाडीने न्यूज अँकरवर बहिष्कार घालण्या ऐवजी राहुल गांधी यांच्यावरच बहिष्कार घातला तरच या आघाडीला लाभ होऊ शकतो अशी खिल्लीही उडवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांनी म्हटले, भारतातील प्रत्येक संस्थेवर विरोधी आघाडीने हल्ला केला निर्णय आहे. मग तो निवडणूक आयोग असो किंवा न्यायालये. या सर्व संस्था चोखपणे आपले कार्य करीत आहेत. मात्र, स्वत:च्या लाभासाठी काँग्रसला कोणावर बहिष्कार घालण्याची गरज असेल तर त्यांनी राहुल गांधींवर तो घालावा अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली.




