नवी दिल्ली: पृथ्वीमुळे चंद्राच्या – पृष्ठभागावर पाण्याची निर्मिती होत असल्याचे ‘चांद्रयान-१’च्या डेटाच्या केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात नेचर अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की पृथ्वीचे ऊर्जा इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास मदत करत आहेत. इस्रोची चंद्र मोहीम चांद्रयान-१’ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध घेतला होता.
आता पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याचे कारण पृथ्वीवरून जाणारे ऊर्जा इलेक्ट्रॉन आहे. अमेरिकेतील मानोवा येथील हवाई विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा खुलासा केला आहे. संशोधनात असे समोर आले आहे की पृथ्वीभोवती असलेल्या प्लाझ्माच्या शीटमुळे चंद्राचे दगड वितळत राहतात, ज्यामुळे खनिजे तयार होतात. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचे हवामान आणि वातावरणही बदलत असते.
नेचर अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन्समुळे पाणी तयार होत आहे. तथापि, शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे. याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. एवढेच नाही तर त्याबद्दल जाणून घेणेही खूप अवघड आहे. यामुळेच चंद्रावर पाण्याची उत्पत्ती होण्याचे कारण कळू शकलेले नाही.
पाण्याचे प्रमाण जाणून घेणे मोठे आव्हान
चंद्रावर पाणी कसे आणि कुठे सापडेल किंवा तेथे किती वेगाने पाणी निर्माण करता येईल, ते भविष्यात तेथे मानवी वस्ती उभारण्यास मदत करणार ठरेल. २००८ मध्ये चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान-१ या चांद्र मोहिमेच्या एका उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण असल्याची माहिती दिली होती. सौर वाऱ्यामध्ये उच्च ऊर्जा कण असतात जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. जे चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत असतात. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ या प्रक्रियेला जबाबदार मानतात. एवढेच नाही तर चंद्रावरील हवामानात बदलही त्यामुळेच घडतात. यासोबतच जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे संरक्षण करतो.




