पुणे :- पुणे कॅन्टोन्मेंट बँकेची ५० वी सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात रविवार दिनांक २४.०९.२०२३ रोजी संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे होते.
यावेळी ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. अध्यक्ष कैलासमामा कोद्रे यांच्या वतीने बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा स्मिता लडकत यांनी अध्यक्षीय भाषणाचे वाचन केले. पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक ही सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आर्थिक समृध्दी यावी या ध्येयाने प्रेरित होवून करीत आहे.
कोविड काळापासून गरजूंना कमी व्याजदराची त्वरीत शाखास्तरावर मंजुरीची कर्जयोजना अद्यापही चालू आहे. त्याचा अनेक ग्राहकांनी लाभ घेतला असून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. अहवाल वर्षात बँकेने जोमाने कामकाज करीत बँकेची आर्थिक स्थिती मागील आर्थिक वर्षापेक्षा चांगली ठेवण्यात यश मिळविले आहे.
बँकेचा सीडी रेपो वाढला आहे व एनपीए प्रमाण कमी झाले आहे. बँक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सेवा पुरवित आहे त्यास अनुसरून बँकेने आधुनिक डिजिटल सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. मार्च २०२३ अखेर बँकेच्या ठेवी २८९ कोटी रुपये, कर्ज वितरण १६१ कोटी रुपये, निव्वळ नफा एक कोटी ६० लाख रुपये असून ऑडिट वर्ग अ आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीनंतर सभासदांना लाभांश वितरित करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर सभासदांना लाभांश वितरण
या सभेत सेवकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. बँकेत २५ वर्षांपासून काम करत असलेल्या सेवकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष साहेबराव लोणकर, संचालक मंगल टिळेकर, शांताराम चौधरी, नंदकिशोर बिडकर, देवेंद्र भाट, अविनाश कवडे, दिलीप जगताप, संदीप कोद्रे, अनिल आबनावे, ज्ञानेश्वर मोझे, किशोर संघेलीया, तज्ञ संचालक संतोष पेठे, जीवन म्हेत्रे, सेवक संचालक अरुण जवळकर, अविनाश वनमाले, महाव्यवस्थापक अस्लम तांबोळी इत्यादी उपस्थित होते.




