गोवा : आम आदमी पक्षाने (आप) बढती दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोव्यातील नेत्या प्रतिमा कुटीन्हो त्या पक्षातून बाहेर पडल्या. त्यामुळे आपही चकित झाल्याचे समोर आले.
आपने नेमलेल्या टीममध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे अमित पालेकर यांच्याकडे कायम ठेवण्यात आली. प्रतिमा यांच्यावर उपाअध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, त्यांनी बुधवारी आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव ते पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. गोव्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्याआधी प्रतिमा काँग्रेसला रामराम ठोकून आपमध्ये दाखल झाल्या होत्या. आता आपला रामराम ठोकण्याच्या त्यांच्या निर्णयाविषयी पालेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.




