मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गांधी घराण्यातील कोणी देशाचे नेतृत्व करेल असे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना राहुल गांधी यांच्याविषयी प्रशांसोद्गार काढले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल यांना गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. ते एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असे भाकित पवार यांनी केले.
विरोधी पक्षांनी एकत्र येत देश पातळीवर इंडिया या नावाने आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीतील घटक पक्ष मनाने जवळ आल्याच्या बाबीवर पवार यांनी राहुल यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने शिक्कामोर्तब केले. मी भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप समवेत गेलेल्यांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही. तपास यंत्रणांच्या भीतीमुळे त्यांनी तसे केले, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.



