मुंबई :- राज्यात २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा २०१९ च्या राष्ट्रपती राजवटीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
राष्ट्रपती राजवटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही शरद पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा करत होतो. यासंदर्भात आम्ही मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या होत्या. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पवारांनी फेटाळला दावा….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावला. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही नकार कसा देऊ शकतो? त्यांच्याकडे संख्याबळ आहे. ते माझे का ऐकतील, अशी विचारणा पवार यांनी केली.


