अहमदाबाद : आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून येथे प्रारंभ होत आहे. गतविजेता इंग्लंड व सर्वाधिक वेळा उपांत्य व अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंड यांच्यात आज सलामीचा सामना होणार आहे. सामना जरी या दोन संघात होत असला तरीही चर्चा यजमान भारतीय संघाच्याच संभाव्य विजेतेपदाची रंगत आहे.
चौकार व षटकारांची आतषबाजी तसेच उच्चांकी धावसंख्या उभारण्यात तसेच त्याचा पाठलाग करण्यात रंगणारा हा ‘रन’ संग्राम पाहण्यासाठी देशवासी सज्ज बनले आहेत. १९८३ सालानंतर २०११ साली भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आता यंदा विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता तमाम क्रिकेट प्रेमी लागली आहे.




