हदयाचे मुख्य कार्य म्हणजे संपूर्ण शरीरातील अवयवांना शुद्ध रक्त पुरविणे तेही अखंडितपणे, अहोरात्र, वस्तुतः हृदय जरी शरीरातील अवयवांना रक्त पुरवण्याचे कार्य करत असले तरी स्वतःलाही रक्त पुरवण्याचे कार्य करत असते. तरी सुरळीतपणे रक्तपुरवठा होणे गरजेचे असते, त्यासाठी हृदयाभोवती रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे (कोरोनरी आर्टरीज) जाळे असते. काही काही कारणांनी त्या कडक अरुंद होतात याला ‘अथेरोस्क्लेरोसीज’ म्हणतात. यामुळे वाहिन्यांची लवचिकता कमी होऊन अडथळे (ब्लॉकेजस) निर्माण होतात.
हृदयविकारास कारणीभूत घटकांनाच रिस्क फॅक्टर असे म्हणतात. ज्यामध्ये स्थूलपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, चरबी विकृती, अनुवंशिकता यांचा समावेश होतो. अशा या नाजूक अवयवांना होणाऱ्या आजारांच्या ग्रहणातून सुटका करावयाची असेल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी बायपास अशा अवजड खर्चिक गोष्टीच्या शरणी जायचे नसेल, तर आपल्या काळजाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
योग्य वेळी योग्य लक्षणांकडे दुर्लक्ष केले नाही तर आयुष्य सुखकर होते. गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतिबंधात्मक किंबहुना पर्यायी हृदयरोग उपचारांद्वारे हजारो रुग्णांना दिलासा देणाऱ्या पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर मार्फत विनाशस्त्रक्रिया हृदयरोग उपचारांमध्ये मैलाचा दगड रोवला आहे. येथे भूल, सर्जरीशिवाय व अॅडमिट न होता प्रिव्हेंटिव्ह हार्ट प्रोग्राम द्वारे हृदयविकारांवर उपचार केले जातात.
कार्डिओलॉजिस्टसह इतर तज्ज्ञ डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत. या उपचारांमध्ये विशेषतः यूएसएफडीए प्रमाणित जगातील सर्व कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांनी मान्यता दिलेल्या अमेरिकन बनावटीच्या मशीनद्वारे ईसीपी उपचार केले जातात. ज्यामुळे अँजिओप्लास्टी बायपास या उपचारांची गरज उरत नाही.
जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असणारे ईएसएमआर उपचार पुण्यामध्ये सर्वप्रथम उपलब्ध करून देण्यात आले. ‘२ डी इको’ तपासणी व ध्वनी लहरींच्या सहाय्याने उपचार दिले जातात. त्यामुळे वारंवार दम लागणे, छातीत दुखणे कमी होण्यास मदत होते. अत्यंत कमी वेळ व परिणामकारक उपचार घेणे अनेक रुग्णांना सोयीचे वाटत आहे. किलेशन, एचबीओटीद्वारे त्यांची परिणामकारकता वाढविली जाते.




