पुणे : जम्मू- काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या नावे बनावट शस्त्र परवाना देणारे रॅकेट वानवडी पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या बनावट परवान्याच्या आधारे शहरात बाउंसर, सिक्युरिटी आणि एटीएमला कॅश पुरवणाऱ्या व्हॅनवर सिक्युरिटी म्हणून काम करणाऱ्या परराज्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल १२ सिंगल बोर रायफल, ५६ जिवंत राउंड / काडतुसे आणि तीन बनावट शस्त्र परवाने जप्त करण्यात आले.
सूत्रधार जम्मू-काश्मीरमध्ये ?
पोलिसांना शस्त्र परवान्याचा संशय आल्याने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजोरी आणि अनंतनाग मॅजिस्ट्रेटकडे अहवाल मागवला होता. त्यांनी शस्त्र परवाने बनावट असल्याचा अहवाल दिला. बनावट शस्त्र परवाने देणारी टोळी कार्यरत असून, त्याचा मुख्य सूत्रधार जम्मू- काश्मीरमध्ये असल्याची शक्यता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
संतोष जैनाथ शुक्ला (५०, रा. हडपसर, मूळ प्रयागराज), रामप्रसाद पासवान (३५, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल), राजेश बबलु पासवान (३५), दिनेश जगदीश पासवान (५४, तिघेही रा. फतेपूर उत्तर प्रदेश) इम्रान मोहमद जिमी खान (३०), मोहंमद बिलाल मोहमद निसार (३०), साहिल कुमार चमनलाल शर्मा (२५)




