सध्याच्या प्रेटिबल जगात टापटीप दिसणं याला खूप महत्त्व आहे. दात वेडेवाकडे असतील व दातांमध्ये फटी असतील तर त्यांचे विवाह जमण्यास अडचणी येत आहेत. वाकड्या तिकड्या दाताचा जोडीदार नको अशी क्रेझ विवाहइच्छुकांमध्ये वाढत आहे.
एखाद्या व्यक्तीस जेव्हा पहिल्यांदा भेटतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एका प्रत्येकाच्या रंगरूपानुसार वेगवेगळी पडते; पण सगळ्यात आधी दिसतात ते चेहन्यावरच्या गोष्टी, त्यात जर दात वेडेवाकडे असतील तर निश्चितच व्यक्तिमत्त्वावर वेगळा परिणाम होतो त्यामुळे अशा मुला-मुलींच्या लग्नामध्ये बऱ्यापैकी अडचणी येतात, असे वधू-वर मंडळाच्या संचालकांनी सांगितले
अनेकदा दात वेडेवाकडे होण्याचं प्रमुख कारण है आनुवांशिक असू शकते. दात व जबडयाच्या आकारामध्ये असलेला असमतोल हेदेखील एक प्रमुख कारण आहे. तसंच दुधाच्या दातांच्या लवकर किंवा उशिरा पडण्यामुळेही दात वेडेवाकडे होऊ शकतात. अंगठा चोखणं, नखे खाणं, पेन, पेन्सिल चावणं, यामुळे दात वेडेवाकडे होतात.




