
होळकर हे लासलगाव येथील मराठा तरुण नेतृत्व असून, सरपंच ते लासलगाव बाजार समितीच्या सभापती पदापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. मंत्री भुजबळ हे येवला मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत असल्यापासून होळकर भुजबळांचे समर्थक आहेत. लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत होळकर यांनी भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे नेतृत्वही केले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ हे आरक्षणाला विरोध करीत असल्याची भावना असल्याने त्यांना मराठा समाजाकडून विरोध होत आहे. त्यातून होळकर यांनी भुजबळांची सोडली आहे.