
मुंबई – जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे 18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एकदिवसीय आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार सरकारी- निमसरकारी कर्मचारी उपसणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मागील संपानंतरही राज्य सरकारकडून सकारात्मक हालचाली होत नसल्याने राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी संघटनांची आज बैठक झाली.
या बैठकीत संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. सरकारने आश्वासन देऊनही काही कार्यवाही न केल्याने आणि सरकारी कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा आदी 17 मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी आंदोलन-संप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.