अजित पवार यांच्या कामकाजांची गाडी सुसाट धावत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुण्यात चांगलेच कामाला लागले आहेत. अजित पवारांची आज पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत बैठक पार पडली. अजित पवारांनी जवळपास 3 तास ही बैठक घेतली.
आपल्या आपल्या प्रभागात जनतेची कामं करा, प्रभागातील सगळे प्रश्न आणि अडचणी मार्गी लावा, असा आदेश अजित पवारांनी दिला. कुणाच्याच प्रभागात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं. “आवश्यक असणाऱ्याच प्रकल्पाना निधी देणार, वायफळ खर्च टाळा”, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच राहिलेली सगळी कामे पूर्ण करा, अशा सूचना अजित पवारांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.