मुंबई : उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी आपले शिलेदार जाहीर केले आहे… ठाकरे गटाने आपले विभागीय नेते जाहीर केले आहेत.. संघटनात्मक बांधणीची नवी रचना ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, आणि विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पुण्याची जबाबदारी संजय राऊतांवर आहे.. तसंच अरविंद सावंत यांच्याकडे पश्चिम विदर्भ तर भास्कर जाधवांकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे.. अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र पाहतील तर राजन विचारेंवर ठाणे-पालघरही जबाबदारी आहे.. जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौराही करणार आहेत.. उद्धव ठाकरेंचा दौरा आणि जाहीर सभांच्या तारखाही लवकरच जाहीर केलं जाणार आहे



