नवी दिल्ली- उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर १७ दिवसांनी सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या मदतकार्याला अखेर यश आलं आहे. सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
12 नोव्हेंबरला बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यासाठी विदेश तज्ज्ञांची मदत देखील घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मदतकार्याकडे लक्ष ठेवून होते. तसेच विविध एजेन्सी मदतकार्यामध्ये गुंतल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलं आहे. सर्व मजूर बाहेर आल्याने सर्व भारतीयांमध्ये आनंदाची भावना आहे.
#WATCH | On the successful evacuation of all the workers from Uttarkashi tunnel, Cyriac Joseph, MD & CEO, Squadrone Infra Mining Pvt Ltd and one of the members of the rescue operation says, " It was not just a difficult mission but war for humanity…we're glad to be a part of… pic.twitter.com/XsV4Xt6G5j
— ANI (@ANI) November 28, 2023
बोगद्याचे काम सुरु असताना काही भाग कोसळल्याने ४१ मजूर आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते, पण या कामात विविध अडथळे येत होते. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व बाजुंनी खोदकाम सुरु होते. ऑगर मशिन आपल्या कामात अपयशी ठरली होती. त्यानंतर रॅट मायनर्सने महत्त्वाची भूमिका बजावली. रॅट मायनर्स टीममुळे मजुरांपर्यंत लवकर पोहोचता आल्याचं सांगितलं जातं.




