पुणे : आगामी लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहणाऱ्या देशातील पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचा सर्वे नुकताच समोर आला आहे. यामध्ये तीन राज्यात काँग्रेस आघाडीवर दिसून येत आहे तर एका ठिकाणी भाजप व एका राज्यात त्रिशंकू परिस्थिती दिसत आहे.
यामध्ये राजस्थान मधील काँग्रेसची सत्ता भाजप खेचून घेताना दिसत आहे. तर तेलंगणा राज्यात निर्वावाद सत्तेवर असणाऱ्या बी. आर. एस. पक्षाने महाराष्ट्रात शिरकाव करण्याच्या नादात स्वतःचे राज्य हातातून गमावल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी काँग्रेसने मोठी आघाडी घेत तेलंगणावर काँग्रेस पकड मजबूत करताना दिसत आहे.
तसेच मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर असून सध्याच्या सीओटर प्रमाणे भाजप पेक्षा पाच ते दहा जागा अधिक काँग्रेस जिंकून येताना दिसत आहे त्यामुळे मागील पंचवार्षिक मध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली होती मात्र सिंधिया याला भाजपने गळाला लावून सत्ता हस्तगत केली होती यावर्षीही समोर आलेल्या आकडेवारीवरून काँग्रेस व भाजप सत्ता संघर्ष होणार हे दिसून येत आह.







