राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आज 4 राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये मतमोजणी सुरू आहे. यामध्ये केवळ तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह छत्तीसगड मध्येही भाजपचे सरकार बनणार आहे अशी शक्यता आहे.
एकूण जागा : ९०
भाजप : ५५
काँग्रेस : ३२
इतर : ०३
आता छत्तीसगडमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आहे. यावेळीही माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत, छत्तीसगडमधील सर्व 90 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप 52 जागांवर तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत राज्यात भाजपला बहुमत मिळेल, असे म्हणता येईल.
डॉ. रमण सिंग हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. रमण सिंह यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1952 रोजी रायपूर येथे झाला. त्यांचे वय 71 वर्षे असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विघ्नहरन सिंह ठाकूर आणि आईचे नाव सुधा सिंह आहे. रमण सिंह यांच्या पत्नीचे नाव वीणा सिंह आहे. जनसंघाच्या युवा शाखेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.




