राजस्थानमध्ये (शनिवारी) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान पार पडलं. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात आहे, त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदारांनी मतदान पेटीत बंद केलं आहे. राज्यात गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी सत्ता बदलते.
एकूण जागा : १९९
- भाजप : ११२
- काँग्रेस : ७१
- इतर : १६
सालाबादप्रमाणे राज्यातील सत्ता बदलणार की, राजस्थानची जनता पुन्हा काँग्रेसलाच संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला 100 ते 110 आणि काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्ष यांना 5 ते 10 जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध काँग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.
- राजस्थानात सत्ताबदलाची परंपरा कायम; भाजप आघाडीवर
राजस्थानात मतदारांनी सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवली आहे. समोर आलेल्या कलांनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे. तर राजस्थानमधील प्रमुख नेत्यांपैकी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, वसुंधरा राजे आघाडीवर आहेत.
- सचिन पायलटांकडं दुर्लक्ष करणं काँग्रेसला पडलं महागात
गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड राजस्थान विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. इथं काँग्रेस सत्तेपासून कोसो दूर असल्याचं ट्रेंडवरून स्पष्ट झालंय. संपूर्ण राज्यातील काँग्रेस आणि भाजपच्या यशस्वी उमेदवारांचा आलेख पाहिला तर सर्वप्रथम लक्षात येतं ते म्हणजे, काँग्रेसबाबत विश्लेषक ज्या भीतीचं भाकीत करत होते, तेच घडलं आहे. सचिन पायलटांकडं दुर्लक्ष करणं काँग्रेसला चांगलंच महागात पडलं आहे. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.




