पनवेल : अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील अर्पिता फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा दोन तरूणांनी प्रयत्न केला.
कुंपणाच्या तारा तोडून अजेशकुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख या दोघांनी फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.. त्या दोघांना सुरक्षारक्षकांनी पकडलं असून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. दोघांकडेही बनावट आधार कार्ड सापडलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता हा प्रकार घडला.




