मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय त्यानंतर हा दौरा निश्चित केला जाईल. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा निश्चित असला तरी त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अयोध्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, देशभरातील भाजप नेत्यांना तसेच प्रमुख नेत्यांना या सोहळ्यात उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात मात्र २० जानेवारी रोजी रात्री उशिरा अचानकपणे मुख्यमंत्री या सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच लवकरच याबाबतची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती. त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत.



