कराड : कराड शहर कृष्णा कोयनेच्या संगमाने संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. शहराला तीनही बाजूने दोन नदीने वेडा घातला आहे अतिशय सुजलाम सुफलाम असणाऱ्या कराड शहरात पाण्याची कधीही कमतरता नसते. मात्र शहरातील चारही बाजूने चौपदरीकरण केलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असणारी झाडे मात्र पाण्याविना कासावीस झाले आहेत. जानेवारी महिन्यातच उन्हाळ्या बाकी असताना शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.
कृष्णा व कोयना नदीने संपूर्ण कराड शहर, मलकापूर आणि सैदापूर शहर चारही बाजूने विकसित होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारच्या निधीतून कराड शहराला जोडणारे सर्व रस्त्याचे चौपदरीकरण केले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर झाडे लावलेले आहेत. या झाडांची निगा राखण्याचे काम कराड नगरपालिका, मलकापूर नगरपरिषद व सैदापूर ग्रामपंचायत यांच्या मार्फत करणे अपेक्षित आहे. मात्र, शहरात येताना चारही बाजूच्या डिव्हाइडरवरील झाडे पाण्याविना शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे वरदान लाभलेल्या कराड शहरातील नदीपात्रालगत व शहरातील नागरिकांनी स्वतःच्या जागेत अनेक झाडे वाढवले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणांच्या झाडांची देखभाल दुरुस्ती करण्याची काम मात्र सरकारी यंत्रणांकडून कमी होताना दिसत आहे. कराड शहराला पाटणकडून येणारा रस्ता, ढेबेवाडी कडून येणारा रस्ता, विटाकडून येणारा रस्ता आणि तासगावकडून येणारा रस्ता अशा विविध रस्त्यावरून शहरात येताना मोठमोठे रस्ते दिसत आहेत. मात्र याच रस्त्याच्या मध्यभागी असणारे झाडांची अवस्था पाहताना दुःख होते. कृष्णा कोयना नदी बाराही महिने दुतोंडी भरून वाहत असतात. तरी झाडांची अशी दयनीय अवस्था असल्याने याकडे प्रशासन उघड्या नजरेने पाहणार का? असावा समस्त कराड मधील नागरिक करत आहेत.




