संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. आज (गुरुवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमक्या आजच्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे. गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास अगोदर एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे दर निश्चित करत असतात. कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंदरचे दर वाढवले आहेत. १९ किलोच्या सिलिंडरचे दर वाढलेले आहेत. घरगुती वापराच्या गॅसच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही.
कुठे किती वाढ?
राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर १४ रुपये वाढले असून १७६९.५० रुपये प्रति सिलिंडर असा नवीन दर असेल.
कोलकाता येथे सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढून १८८७ रुपये झाली आहेत.
मुंबईत एलपीजी सिलिंडरचे दर १५ रुपयांनी वाढून १७२३.५० रुपये इतके झाले आहेत.
चेन्नईमध्ये १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरचे दर १२.५० रुपयांनी वाढून १९३७ रुपये झाले आहेत




