पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त बदलण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी देखील बदलण्यात आले आहेत. पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख हे आधी पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी आता सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने आज काढले आहेत. दिवसे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारावा असेही आदेश राज्य सरकारने दिले आहे.
दिवसे हे सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दिवसे यांच्या जागेवर नवीन क्रीडायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.




