पुणे :- पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठी कारवाई केर्ली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्याचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत आणि डीवायएसपी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. या EVM चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले EVM मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.
त्यानंतर आता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुरंदरच्या प्रांताधिकारी वैशाली लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्ड यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
सासवड येथील तहसील कार्यालयातील स्ट्रॉग रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेले ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे सोमवारी (दि. ५) उघड झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासात 2 चोरांना या प्रकरणी अटक केली, पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटने जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.




