पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजी आढळराव यांना उमेदवारी वर्णी लागली आहे, मग आता महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातुन बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मात्र या चर्चां शिवाजी आढळराव पाटलांची खोडून काढल्या आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही, मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार देखील, असा दावा त्यांनी केला आहे.
पुणे म्हाडाच्या अध्यक्षपद देऊन त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसत आहे असंच घडणार असेल तर मग आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद बहाल करण्याची शाळा नेमकी कोणाची असेल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. आता आढळरावांना जर शिरुर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल तर मग महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार? याबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधलाय. तसं जाहीर आव्हानच अजित पवारांनी कोल्हेंना दिलंय. पण घड्याळाचा चिन्हावर उभं राहणारा आणि कोल्हेचा काटा काढणारा तो तुल्यबळ उमेदवार कोण असणार? शिवाजी आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद दिल्यानंतर या चर्चांना पुन्हा उत आला आहे.




