नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काल सांगितले की पतंजली आयुर्वेदाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी औषधांसंबंधीच्या जाहिरातींबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लंघन दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा केली आहे.
पुढील आदेश येईपर्यंत जाहिरात करू नये
सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदने पुढील आदेश येईपर्यंत आपल्या कोणत्याही वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करू नये. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वैद्यकीय विधान मीडियामध्ये करू नये, असे निर्देश दिले आहेत.




