महायुतीच्या जागव वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची सतत दिल्लीत बैठक होत आहे. अखेर नुकत्याच झालेल्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
भाजपची दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले होते.
भाजपच्या या नेत्यांची उमेदवारी पक्की ?
भाजपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तर बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजयकाका पाटील यांना सांगलीतून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालीय. एकूण 25 जागांवर चर्चा झाली आहे.



