नाशिक पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाला रामराम ढोकला आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत परतीचे दोर कापले असे स्पष्ट केले. त्यावर बोलताना शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोरे न्यू वाशिंग मशीन दिशेने जाऊ नये असा सल्ला दिला.
वसंत मोरेंनी मनसेला रामराम केलं यावर मी काय बोलू… त्यांनी पुढील दिशा ठरवली पाहिजे. लोकसभा लढवायची असेल तर कोणत्या पक्षाकडून लढवली पाहिजे हे वसंत मोरे यांनी स्पष्ट करावे. फक्त त्यांनी भाजपच्या वाशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. शरद पवाराकडून मोरे यांनी मार्गदर्शन घेतले असेल तर चुकीचे काय.. शरद पवार देशाचे नेते आहेत अशी मिष्कील टिप्पणी राऊत यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले की, मी कधीच खोटं बोलत नाही संजय राऊत बोलतो ते सत्य बोलतो.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. देशातील हुकुमशहांचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत बरोबर पाहिजेत असे स्पष्ट मत काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना पत्राद्वारे कळवले आहे असे त्यांनी स्ष्ट केले.



