पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापने पूर्वी पक्षाध्यक्ष राजे ठाकरे यांच्यासोबत कायमचे उभे असलेले पुण्यातील फायबर ब्रँड नेते व माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
यापूर्वी नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्येही मनसेचे मोठे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून मोठा धक्का दिला आहे.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे पुण्यात केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यात वसंत मोरे व विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. काही वर्षांपासून वसंत मोरे पक्षांमध्ये नाराज होते. अनेकदा त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे ही नाराजी व्यक्त केली होती.
अचानक त्यांची शहराध्यक्षपदावरून उचल बांगडी केल्यानंतर व पक्षाच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकाच्या कार्यक्रमामध्ये मोरे दांडी मारत होते. त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी मोरे यांची समजूत काढत नाराज दूर केली. काही दिवसापूर्वी मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही केली. मात्र पक्षातील वरिष्ठांनी सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान वसंत मोरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक पोस्ट लिहिली होती. यामध्ये एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो आता आपली कुणाकडूनही काही अपेक्षा नाही असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. त्यानंतर काल थेट पक्षाच्या सर्व सदस्याचा राजीनामा देत मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला.
आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुतारी वाजवून मोरे जाणार की मागील काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या आवाहनाला साथ देत घड्याळाला साथ देणार हे पहावे लागणार आहे.




