
मुंबई : मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे सध्या अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. वसंत मोरे काल शरद पवार यांना भेटले होते. आज त्यांनी सामना कार्यालयात येऊन संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास चर्चा केली. भेटीनंतर वसंत मोरेंनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना तुम्ही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहात, तर महाविकास आघाडी तुमची इच्छा पूर्ण करेल का? असा सवाल केला असता वसंत मोरे म्हणाले की, ”माझे प्रयत्न चालू आहेत. मी कालसुद्धा शरद पवारांना भेटलो. त्याअगोदर मोहन जोशी देखील मला भेटले आणि आज मी संजय राऊतांना भेटलो आहे. पुण्यात माझी जी भूमिका आहे, ती सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल, असा विश्वास वसंत मोरे यांनी यावेळी दर्शवला आहे.
मला वाटतं की, मला जी निवडणूक करायची आहे. ती पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे पहिले गाठीभेटी घेतोय. त्यानंतर ते योग्य तो मार्ग काढतील”. नेत्यांच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले की, ”माझ्या कोणत्याही भेटी या मागच्या दरवाज्यातून झालेल्या नाहीय. मी प्रत्येक ठिकाणी जातोय आणि डायरेक्ट भेटतोय. मी कोणतीच भेट ही अंधारात किंवा पडद्याआड माझी कोणतीच मिटींग झालेली नाहीय. मी ज्या ठिकाणी जातोय त्या प्रत्येक ठिकाणी मला सगळे नेते समजून घेत आहे आणि हे मी माझं भाग्य समजतो.
मी ज्या पक्षामध्ये होतो, त्या पक्षातून मी इथपर्यंत पोहोचलो.” ज्या नेत्यांशी चर्चा होतेय ती सकारात्मक होतेय का? असं विचारलं असता मोरे म्हणाले की, ”जी चर्चा होतेय ती सकारात्मक होतेय. मला वाटतं की, आज जी मिटींग आहे. त्या मिटींगमध्येसुद्धा सर्वजण विचार करतील. पण सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग-मशीन नको. तर मी सुध्दा त्या मताचा आहे. सर्वजण तोच विचार आहेत आणि त्याच विचारांसाठी मी इथे थांबलोय




